पुणे जिल्हा : भाजपच्या आंदोलनाच्या दणक्याने महावितरण खडबडून जागे

सासवड – भाजप कार्यकर्त्यांनी थेट सासवड (ता. पुरंदर) येथील महावितरण कार्यालयात आंदोलन करताच महावितरण खडबडून जागे झाले आणि पारगाव मेमाणे येथे 100 केव्हीची डीपी मंजूर करण्यात आला.

पारगाव मेमाणे (ता. पुरंदर) येथील नागरे वस्तीतील डीपी बंद पडल्यानंतर महावितरण तक्रार केली असता आठ दिवसांनी 100 केव्ही डीपीची गरज असताना अधिकार्‍यांनी 60 केव्हीचा रहित्र पाठवून दिला व तो बसवला लगेच जळाला. त्यानंतर परत आता बारा दिवस झाले तरी रोहित्र बसला नाही.

शेवटी शेतकर्‍यांनी भाजपाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्याशी संपर्क साधला आणि कामठे यांनी महावितरणच्या विरोधात सासवडच्या कार्यालयातच आंदोलन छेडले असता महावितरणने 100 केव्हीचा डीएपी मंजूर केला.

भाजपाच्या या आंदोलनाच्या दणक्याने शेतकरी समाधानी झाला. आंदोलनवेळी जालिंदर कामठे, शहर अध्यक्ष संतोष जगताप, बाप्पू मेमाणे, नारायण मेमाणे, माणिक मेमाणे, हिरामण मेमाणे, संजय पवार, संदीप मेमाणे, संतोष मेमाणे, लक्ष्मण गायकवाड, दत्तात्रेय मेमाणे, शौर्य मेमाणे आदी उपस्थित होते. डीएपी 24 तासांच्या आत जर बसला नाही तर शेतकर्‍यांना महावितरणकडून नुकसानी भरपाई मिळणार का असा सवाल संतोष जगताप यांनी केला.