पुणे जिल्हा : विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एम.के.सी.एल ट्रेनिंग सेंटर सुरू

इंदापूर – इंदापूर विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये एमकेसीएल ट्रेनिंग सेंटर तंत्रशिक्षण संचालनालयाचे माजी संचालक डॉ. एन. बी. पासलकर यांच्या हस्ते सुरू करण्यात आले.

यावेळी डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणेचे माजी प्राचार्य डॉ.विजय वढाई, शासकीय तंत्रनिकेतन, पुणेचे प्राचार्य डॉ. आर. के. पाटील, तसेच माळेगाव पॉलिटेक्निक कॉलेजचे माजी प्राचार्य राजेंद्र वाबळे उपस्थित होते. या प्रशिक्षण केंद्राअंतर्गत एकूण ३१० कोर्सेस उपलब्ध आहेत. यातील कोर्सेस सायन्स,कॉमर्स,इंजिनीरिंग (डिग्री तसेच डिप्लोमा) यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच नोकरी करणाऱ्यांना त्यांचे कौशल्य वाढविण्यास उपयोगी होतील.

हे कोर्सेस हे क्रेडिट १ ते क्रेडिट ५ स्तरावरील असून अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट (एबीसी) मध्ये ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रशिक्षणार्थीला त्याचा रोजगार मिळवण्यासाठी उपयोग होईल, अशी माहिती केंद्र समन्वयक प्रा. सदानंद भुसे यांनी दिली. महाराष्ट्र शासनाची “सारथी”द्वारा मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ या कोर्सला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळेल, अशी माहिती डॉ एन. बी. पासलकर यांनी यावेळी दिली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी हे ट्रेनिंग सेंटर चालू करण्यामागील उद्देश सांगितला. या ट्रेनिंग सेंटरचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांचे व्यवसायिक शिक्षण, वाढविण्याकरता निश्चित होईल व त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्सला प्रवेश घ्यावा, असे आवाहन यावेळी डॉ.सुजय देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना केले.