पुणे जिल्हा : भिगवणमध्ये नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळेंचे स्वागत

भिगवण – बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांचे भिगवण शहरात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. बारामती लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी दीड लाखांचे मताधिक्य मिळवत मोठ्या फरकाने विजय मिळवल्यानंतर सुळे या इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. इंदापूरला जात असताना त्यांचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

दरम्यान, भिगवण येथे आल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात फटाके वाजवत हलगी तुतारीच्या गजरात स्वागत केले. नियोजन स्थळी खासदार सुप्रिया सुळे या तब्बल तीन तासांनी पोचल्या. तरीदेखील मोठ्या उत्साहात कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी चार तासांपासून अधिक वेळ थांबले होते. त्या वेळी पाऊसदेखील आला होता.

मात्र, कार्यकर्त्यांनी थांबून खा. सुळे यांचे स्वागत केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील,कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, दादासाहेब थोरात, आप्पासाहेब गायकवाड, रमेश धवडे, जयवंत जाधव, केशवराव भापकर, राजेंद्र भिसे, अनिल तांबे, लहुजी घोलप, सलमान शेख, हेमंत निंबाळकर, पांडुरंग जगताप, गणेश शेलार, सोहेल बारस्कर, योगेश चव्हाण, साईनाथ दनाने, कपिल शिंदे, कुंडलिक धुमाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.