पुणे जिल्हा: केसनंद येथे होणार पोलीस मदत केंद्र

सरपंच रोहिणी सचिन जाधव यांची माहिती
वाघोली (प्रतिनिधी): 
लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली केसनंद आणि परिसरातील नागरिकांना तातडीने पोलीस यंत्रणेची मदत होण्याची हेतूने पोलीस मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असल्याची माहिती ग्रामपंचायतीच्या सरपंच रोहिणी सचिन जाधव, उपसरपंच सुनिता झांबरे यांनी दिली.

केसनंद येथे पोलिस मदत केंद्राच्या जागेचा भूमिपूजन समारंभ लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी सरपंच रोहिणी सचिन जाधव, उपसरपंच सूनिता दिनेश झांबरे,माजी सरपंच मिलिंद हरगुडे, अलका  सोनवणे, प्रकाश जाधव, माजी सरपंच तानाजी हरगुडे, माजी सरपंच तुकाराम जाधव, माजी सरपंच एसपी हरगुडे,माजी उपसरपंच सचिन जाधव,माजी उपसरपंच संतोष हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य धनाजी हरगुडे,

ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय हरगुडे, प्रमोद हरगुडे, नितीन गावडे ,सचिन हरगुडे, रमेश हरगुडे पाटील, शिवाजी हरगुडे, अमित जाधव, शंकर काका वाबळे, वाल्मीक आबा हरगुडे, , सचिन हरगुडे, गणेश हरगुडे, दशरथ गायकवाड, विकास गायकवाड, सुभाष बांगर, बाबासाहेब हरगुडे, श्रीहरी बांगर, पंडित हरगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.