पुणे जिल्हा :आंबेगाव तालुक्यात बटाटा उत्पादक खूश!

रांजणी (वार्ताहर) – आंबेगाव तालुक्यात नागापूर, थोरांदळे परिसरात बटाटा काढणीची कामे सुरु झाली आहेत. सध्या बटाट्याला 10 किलोला 350 ते 370 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे.

नागापूर, रांजणी, थोरांदळे आदी परिसरात बटाटा पिक घेणाऱ्या शेतकरी वर्गाचे प्रमाण जास्त आहे. यंदा बटाट्याला चांगला बाजारभाव मिळण्याची आशा शेतकऱ्यांना होती. त्यानुसार आता चांगला बाजारभाव मिळत आहे. 35 ते 37 रुपये किलोला भाव सध्या मिळत आहे.

गेल्या पाच वर्षांत यंदा प्रथमच बटाट्याला बाजारभाव चांगला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांना बटाट्याचे गळीत देखिल चांगले मिळाले आहे. एका कट्ट्याला (50 किलो) दहा ते बारा पिशव्यांचे गळीत मिळाले आहे. गेल्यावर्षी एका कट्ट्याला दोन तीन पिशव्यांचे गळीत मिळाले होते.

Leave a Comment