पुणे जिल्हा : प्रशासनाकडून कार्यक्रमाचे योग्य नियोजन

अजित पवार : विजयस्तंभास अभिवादन
अजित पवारांकडून जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान

शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील विजयस्तंभ येथे २०६ वा शौर्य दिन साजरा होत असताना जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने योग्य व उत्तम नियोजन केले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. ऐतिहासिक विजयस्तंभ येथे २०६ व्या शौर्यदिनी उपमुख्यमंत्री पवार यांनी सकाळी विजयस्तंभास अभिवादन केले. यावेळी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांच्या हस्ते अजित पवार यांना विजयस्तंभाची प्रतिकृती देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अरविंद चावरिया, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण उपस्थित होते.—