पुणे जिल्हा : अजित पवारांच्या बंगल्याबाहेर निदर्शने

बारामतीत ओबासी समाज संतापला
बारामती –
बारामतीत ओबीसी समाजाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन केले. ओबीसीतील घुसखोरी थांबवा; अन्यथा तुम्हाला पायउतार करू, असा इशारा शिंदे सरकारला यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिला.

यावेळी आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील सडकून टीका केली. ७० टक्के ओबीसी समाज एकत्र आला तर अजित पवार तुम्ही बारामतीत निवडून येणार नाही, असा इशारा देखील यावेळी दिला.

शिंदे सरकारच्या निषेधार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर ओबीसींनी ठिय्या मांडत आक्रमक भूमिका घेतली. मराठा आरक्षणावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले.

आंदोलनावेळी पोलिसांना मोठा फौजफाटा तैनात केला होता. ओबीसी समाजातील पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी नेत्यांवर टीकास्त्र सोडले. यावेळी वातावरण तणावपूर्ण बनले होते.