पुणे जिल्हा : ऋतुजा होरणेची कृषीसेवकपदी निवड

पळसदेव – पळसदेव (ता.इंदापूर) येथील ऋतुजा नामदेव होरणे हिची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील कृषीसेवक या पदासाठी नुकतीच निवड झाली आहे. तिच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागाच्या कृषी सेवक पदाच्या भरतीसाठी ऑगस्ट २०२३ मध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. जानेवारी २०२४ व १९ जानेवारी २०२४ मध्ये आयबीपीएस संस्थेमार्फत विविध केंद्रावर आयोजित ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. नुकतीच पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.

यामध्ये ऋतुजा होरणेची कृषीसेवकपदी निवड करण्यात आली आहे. ऋतुजा होरणे हिने बारावीपर्यंत श्री नारायणदास रामदास हायस्कुल इंदापूर येथे पूर्ण केल. तर कृषी पदवी कृषी महाविद्यालय सोनई येथून पूर्ण केलं आहे. सध्या पुढील शिक्षणासाठी एम एस सी साठी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे तिची निवड झाली. दरम्यानच तिची कृषी सेवक पदावर निवड झाली आहे.

या वेळी बोलताना ऋतुजाने सांगितले, मी क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवलं होत. याचा या निवडमध्ये फायदा झाला आहे. सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ध्येय ठेऊन अभ्यास केल्यास व त्यात सातत्य ठेवल्यास यश नक्कीच मिळेल. पुढे पोलिस उपनिरीक्षक या पदासाठी अभ्यास सुरू आहे.

त्या पदापर्यंत पोहचण्याचा स्वप्न असल्याचं या वेळी तिने बोलताना व्यक्त केल. या वेळी ऋतुजाच्या यशाबद्दल तिचा सन्मान करण्यात आला. या वेळी ग्रामपंचायत सदस्य अंकुश काळे, स्वप्नील काळे, अजित शिंदे, छगन बनसुडे, मुकुंद फासे, नामदेव होरणे, रामदास पवार, योगेश बनसुडे, ओंकार होरणे, प्रणाली होरणे सह नागरिक उपस्थित होते.