पुणे जिल्हा : कुडजे गावात सापडला सात फुटी अजगर ;महिन्यातील दुसरी घटना..

कुडजे : कुडजे गावातील एका फार्महाऊसवर गुरुवारी सायंकाळी सात वाजता तेथील वॉचमन नवनाथ पुरी यांची मुलगी तेजस्विनी ही अंगणात खेळत होती तेव्हा तिला अजगर दिसला. त्यांनी ताबडतोब गावचे पोलीस पाटील दत्ता पायगुडे यांना फोन करून माहिती दिली.

पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती उत्तमनगर पोलीस स्टेशन आणि वनविभागाला ताबडतोब दिली.  थोड्याच वेळात सर्पमित्र पंकज काळे पृथ्वीराज काळे व स्वप्नील तनपुरे यांनी घटनास्थळी येऊन अजगराला पकडुन एनडीए च्या जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडले.

दरम्यान गावचे पोलीस पाटील म्हणाले, मागच्या महिन्यात आमच्या शेजारील आगळंबे गावात ऐंशी किलो वजनाचा अजगर सापडला होता त्याच जातीचा हा अजगर असून शेतकरी आणि आमची मुकी जनावरे जंगलात असतात त्यांच्या सुरक्षेची काळजी वाटते आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतात काम करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी पोलीस पाटील दत्ता पायगुडे सर्पमित्र पंकज काळे पृथ्वीराज काळे सामाजिक कार्यकर्ते अजित पायगुडे. नवनाथ पुरी उपस्थीत होते.