पुणे जिल्हा : सहकारमंत्र्यांच्या गावात शिंदे गटाचे कारभारी

मंचर – निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) सरपंचपदी रवींद्र जनार्धन वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पॅनलचे संतोष बबन टाव्हरे यांचा 135 मतांनी पराभव केला.

लोकनियुक्त सरपंच म्हणून विजय झालेले रवींद्र वळसे पाटील याच्या धर्मराज पॅनलचे तीन सदस्य निवडून आले आहेत. तर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडेश्‍वर पॅनलचे सात सदस्य निवडून आले आहेत. तर तीन अपक्ष उमेदवार निवडून आले आहे.

निरगुडसर हे गाव सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे गाव असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच त्यांच्या विरोधात असलेले राष्ट्रवादीचे निरगुडेश्‍वर ग्रामविकास पॅनलचे सरपंचपदाचे उमेदवार संतोष टाव्हरे यांचा 135 तर अपक्ष उभे राहिलेले उमेदवार निलेश भीवसेन वळसे पाटील यांचा 1299 मतांनी पराभव झाला आहे.

विजयी सदस्य
पूजा बाबाजी थोरात, राहूल झुंजारराव हांडे, भाऊसाहेब फकीरा वळसे, वैभव हरिभाऊ वळसे, अशोक ज्ञानेश्‍वर कानसकर, अशोक मधुकर टाव्हरे, संतोष किसन कोरके, शिल्पा महेश राऊत, सारिका प्रकाश कडवे, अक्षदा सुभाष टाव्हरे. संगीता आनंदराव हिंगे, संगीता जालिंदर किर्वे, सायली वैभव वळसे (तिघे बिनविरोध).