पुणे जिल्हा : सिकंदर शेख याने जिंकली मानाची गदा

मोईतील पीरसाहेब महाराज यात्रेत रंगला कुस्तीचा आखाडा
चिंबळी –
मोई (ता. खेड) गावामध्ये पीरसाहेब महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांचा आखाडा रंगला होता. या कुस्ती स्पर्धेत शेवटची कुस्ती सिकंदर शेख विरुध्द मनजित खत्री यांच्यात झाली. आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते 3 लाख रुपये व चांदीची गदा बक्षीस म्हणून लावण्यात आली होती. ही कुस्तीमध्ये सिकंदर शेख याने प्रतिस्पर्ध्याला चितपट करून जिंकून 3 लाख रुपये व चांदीची गदा पटकावली. याबद्दल आमदार दिलीप मोहिते पाटील व ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले.

पिरसाहेब महाराज यात्रेनिमित्त मोई येथे गुरुवारी (दि. 28) आयोजित करण्यात आलेल्या निकाली कुस्ती स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी ते म्हणाले, पिरसाहेब महाराज यात्रा साजरी करण्यासाठी सर्व पुढा-यांनी एकत्र येऊन यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि कुस्ती आखाडा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, याचा अभिमान असून सर्व पुढारी व ग्रामस्थ यांचे मनापासून आभार व्यक्त करीत आहेत.

यावेळी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, पोलीस पाटील आणि आजी माजी पदाधिकाऱ्यांसह सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कुस्ती स्पर्धेचे संपुर्ण समालोचन निवदेक पै बाबा निम्हण यांनी केले सुत्रसंचालन पाटील गवारे यांनी केले या स्पर्धेचे आयोजन समस्त ग्रामस्थ मडंळ यात्रा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले