पुणे जिल्हा : भावाच्या मृत्यूच्या धक्क्याने बहिणीचाही अंत

सासवडमधील घटना : परिसरात शोककळा
सासवड –
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील रहिवाशी व किराणा दुकानदार वसंत अशोक जाधव (वय 33 रा. सासवड) यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्यानंतर त्यांच्या बहिणीचाही अंत झाल्याने परिसरात शोककळा पसलरली.

जाधव यांच्या अंत्यविधीसाठी त्यांची बहीण प्रमिला माने (वय 29 रा. पुणे) या अंत्यविधी उरकून आल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर अचानकपणे बेशुद्ध पडल्याचे नातेवाइकांनी पाहिले. भावाच्या मृत्यूचे दुःख अनावर न झाल्याने हृदयविकाराचा तीव्र झटका आला असल्याची चर्चा परिसरात होती.

यानंतर प्रमिला माने यांना सासवड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. बहिण व भावाचा दुर्दैव अंत झाल्यामुळे परिसरामध्ये शोककळा पसरली होती.

वसंत जाधव यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी तर प्रमिला सतीश गायकवाड यांच्या पश्‍चात पती, मुलगी असा परिवार आहे. तर नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल माने यांच्या मामाचा मुलगा व मुलगी होत.