पुणे जिल्हा : डाळजमधील अतिक्रमणांचा प्रश्न मिटवा

पळसदेव : इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर 2 गावातील अतिक्रमणाचा मुद्दा तातडीने न मिटल्यास गावात कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे चित्र निर्माण झालं आहे. तरी या बाबत तातडीने पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी डाळज गावचे सरपंच शकुंतला जगताप यांनी केली आहे.

ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटवणेबाबत ठराव केला आहे. शिवाय गट विकास अधिकारी पंचायत समिती इंदापूर यांनी गावातील अतिक्रमण तातडीने थांबवण्यात यावे, असा लेखी आदेश दिला आहे. तरी देखील पोलीस प्रशासन ग्रामपंचायतीला सहकार्य करत नाही. नसल्याचा आरोप सरपंच जगताप यांनी केला आहे.

डाळज नंबर 2 हे पुनर्वसित गावठाण आहे. यामध्ये गावातील अनेक नागरिकांना राहण्यासाठी पुनर्वसन विभागाने प्लॉट वाटप केले आहेत; मात्र यातील शिल्लक प्लॉट अद्याप पुनर्वसन विभागाच्या मालकीचे आहेत. मात्र गावात हे शिल्लक भूखंडाची देखभाल व त्यावर अतिक्रमण होऊ नये याची काळजी ग्रामपंचायत घेत आहे. असे असताना गावातील पुनर्वसन विभागाचा प्लॅट नंबर 289 व सिटी सर्व्हे नंबर 114मध्ये गावातील काही नागरिकांनी अतिक्रमण केलं आहे.

यावरून गावात वाद निर्माण होऊन कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने हे अतिक्रमण हटवण्याची ग्रामपंचायतीने रीतसर नोटीस देऊन तातडीने अतिक्रमण हटविण्याची सूचना करून देखील अतिक्रमण थांबत नाही. शिवाय गटविकास अधिकारी इंदापूर व भिगवण पोलीस स्टेशनच्या वतीने देखील समाज देण्यात आली आहे.

 पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे
संबंधित नागरिक प्रशासनच आदेश पायदळी तुडवून बळाचा वापर करून प्लॅट नंबर 289 व सिटी सर्व्हे नंबर 114 मध्ये बांधकाम करत आहे. त्यामुळे भविष्य काळात गावातील इतर प्लॉट वर देखील आशाच प्रकारे बाळाचा वापर करून अतिक्रमण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. व यातून मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी याबाबत तातडीने पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.