पुणे जिल्हा : सविंदणेच्या सरपंचपदी सोनाली खैरे

सविंदणे (प्रतिनिधी) : सविंदणे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली खैरे यांची तर उपसरपंचपदी भाऊसो लंघे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक झाल्यानंतर सरपंच, उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सोनाली खैरे यांचा सरपंचपदासाठी व भाऊसो लंघे यांचा ऊपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

त्यांच्या निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच, उपसरपंच यांचा नागरी सत्कार करण्यात आला. गावामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता आली असून राज्य ऊप्तादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन केले आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळासाहेब भोर यांनी केले तर आभार माऊली पुंडे यांनी मानले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन अरूण जोरी, तलाठी आबासाहेब मोरे, ग्रामसेवक कुंदन रोकडे यांनी काम पाहीले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शुभांगी पडवळ, मनीषा नरवडे, रेखा भोर, नंदा पुंडे, मालूबाई मिंडे, भोलेनाथ पडवळ, रवींद्र पडवळ, ईश्वर पडवळ, गोरक्ष लंघे व पॅनलप्रमुख वसंत पडवळ, बाळासाहेब भोर, बाळासाहेब खैरे, बाळासाहेब पडवळ, मोहन किठे, वसंत आप्पा नरवडे, अरूणकुमार मोटे व ग्रामस्थ मोठया संख्येने हजर होते.

यावेळी टाकळी हाजी औटपोस्टचे पोलिस उपनिरीक्षक बिरुदेव काबुगडे, पो. अमंलदार विशाल पालवे,पो. अमंलदार राजेंद्र गोपाळे, पो. अमंलदार करणसिंग जारवाल यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

Leave a Comment