पुणे जिल्हा : चांडोहच्या सरपंचपदी सोनाली शरद खराडे

सविंदणे – शिरूर तालुक्यातील चांडोह येथील सरपंचपदी सोनाली शरद खराडे यांची बिनविरोध निवड झाली. तत्कालीन सरपंच वंदना पानमंद यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी खराडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी माधुरी बागले, ग्रामविकास अधिकारी पूनम थोरात, तलाठी ब्रम्हानंद टाचले, यांनी काम पाहिले. तत्कालीन सरपंच वंदना पानमंद, उपसरपंच रामभाऊ येवले, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील सुदर्शन भाकरे, कोतवाल स्वाती झिंझाड, राजकीय, सामाजिक, शैक्षाणिक क्षेत्रातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी पुणे जिल्ह्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. सुभाष पोकळे, शिरूर पंचायत समितीच्या माजी सदस्या अरुणा घोडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिरूर आंबेगावचे तालुकाप्रमुख गणेश जामदार,

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख महादू भाकरे, शिवाजी रोकडे, गटप्रमुख पोपटराव भुजबळ, शाखाप्रमुख मनीषा भाकरे, ग्रामपंचायत सदस्या, युवा नेते मच्छिंद्र शेठ भाकरे, केशव कोंडे, माजी सरपंच बाळासाहेब टाव्हरे, चेअरमन दत्तात्रय भाकरे, बुथ प्रमुख आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.