पुणे जिल्हा : कळमोडीच्या सरपंचपदी सुनीता गोपाळे

बिनविरोध निवड : आमदार दिलीप मोहितेंच्या हस्ते सत्कार
राजगुरूनगर – कळमोडी ग्रामपंचयतीच्या सरपंचपदी सुनीता नामदेव गोपाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गेल्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये सरपंच हेमलता बजरंग गोपाळे यांनी ठरल्या प्रमाणे सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी नुकतीच विशेष सभा बोलावण्यात आली होती.

यावेळी सुनीता गोपाळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कुडा मंडळाचे मंडलाधिकारी योगिता पिंगळे यांनी जाहीर केले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कळमोडी ग्रामपंचायत ग्रामसेवक एमडी देवाडे यांनी काम पाहिले. दरम्यान, आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे राष्ट्रवादीचे पश्‍चिम विभागाचे अध्यक्ष नामदेव गोपाळे यांच्या त्या पत्नी आहेत.
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मंगलदास पवार, योगेश नवले,राजू गोपाळे, सुदाम पवार, दिगंबर गोपाळे उपसरपंच नंदकुमार अभंग, यशवंत गोपाळे,सुरेश गोपाळे, विजय पवार, विठ्ठल गटे, तुकाराम नवले, गाबाजी गोपाळे, माऊली गोपाळे, दिनकर गट्टे मुरलीधर नवले, भिमाजी गोपाळे, दत्ता गोपाळे व सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न केले. यावेळी बजरंग गोपाळे, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक अरुण चांभारे, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस लक्ष्मणराव मुके, चिखलगावचे माजी सरपंच बाळासाहेब गोपाळे उपस्थित होते. निवड झाल्यानंतर खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, सुरेख मोहिते पाटील यांनी सुनीता गोपाळे यांचा सत्कार केला.

पुढील काळामध्ये खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील, ज्येष्ठ नेते पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक चांभारे यांचे नेतृत्वाखाली गावचा व भागाचा उर्वरित विकास करण्याची भूमिका राहील, कळमोडी धरण प्रकल्प ग्रस्तांचे प्रश्‍न हे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. गावातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन काम करण्याची इच्छा आहे.
– सुनीता गोपाळे, नवनिर्वाचित सरपंच