पुणे जिल्हा : इंद्रायणी जलप्रदूषण मुक्तीसाठीचे उपोषण पाचव्या दिवशी सुरूच

आळंदी – आळंदी येथे राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र यांच्या वतीने दि. 15 पासून इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा पाचवा दिवस सुरू आहे.

महाद्वार चौकात हभप मोहनानंद महाराज ओवाळ, हभप मुबारक शेख, फारूक इनामदार, हभप दत्तात्रय साबळे यांचे हे बेमुदत उपोषण चालू आहे.

राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र यांच्या उपोषणकर्त्यांनी यावेळी सांगितले, की महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी लाक्षणिक उपोषण सुरू होतील.

उपोषणस्थळी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे यांनी सदिच्छा भेट देत उपोषणास पाठिंबा दिला आहे. तसेच माजी नगराध्यक्ष बबनराव कुर्‍हाडे, नंदकुमार कुर्‍हाडे, अनिल महाराज तापकीर, रंगनाथ बोराटे, भाऊसाहेब कोळेकर, गणपतराव कुर्‍हाडे, सतीश कुर्‍हाडे,

आनंदराव मुंगसे, मंगेश तिताडे व आळंदी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील मान्यवर यांनी उपोषणस्थळी जाऊन इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी उपोषणास पाठींबा दिला. आजसुद्धा सिद्धबेट जुन्या बंधार्‍या खालील नदीपात्र जलप्रदूषणामुळे फेसाळलेले होते.