पुणे जिल्हा : ‘प्रभात’च्या दणक्‍याने रेल्वे प्रशासन जागे

थोपटेवाडी रेल्वे फटक रस्त्यावरील खड्डे बुजवले
नीरा –
“थोपटेवाडी रेल्वे फाटक रस्ता खड्ड्यां’त मथळ्याखाली दैनिक “प्रभात’ने वृत्त प्रसिद्ध करताच झोपलेले रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले अन्‌ खड्डे बुजवले, त्यामुळे स्थानिकांसह प्रवाशांनी “प्रभात’चे आभार मानले आहेत.

रेल्वेच्यावतीने मागील आठवड्यामध्ये थोपटेवाडी गेटमध्ये नवीन लोहमार्गाचे काम करण्यात आले होते. यावेळी या ठिकाणी पाणी काढून देण्यासाठी ड्रेनेज लाइनचे सुद्धा काम करण्यात आले होते. यावेळी डांबरी रस्ता खोदण्यात आला होता.

या ठिकाणी पाइप टाकल्यानंतर रेल्वेने तात्पुरते खड्डे बुजवले होते; मात्र गेले तीन-चार दिवस सुरू असलेल्या पावसाने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे लोकांना वाहन चालवताना खूप त्रास होत होता. दरम्यान, “प्रभात’च्या वृत्तानंतर बुधवारी (दि. 13) सायंकाळी रेल्वे प्रशासनाने हे खड्डे बुजवले आहेत.