पुणे जिल्हा : वाघोलीत सिस्का कंपनीच्या गोडाऊनमधून 54 लाखांची चोरी

वाघोली : वाघोली तालुका हवेली येथील सिस्का एल इ डी लाईट इयर्स अ हेड, या कंपनीच्या गोडाऊन मधून जवळपास 54 लाख रुपये रकमेच्या विद्युत उपकरणांच्या साहित्याची चोरी झाल्याचा गुन्हा लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून यासंदर्भात कंपनीचे जनरल मॅनेजर नितीन शिवाजीराव नेवसे यांनी फिर्याद दिली आहे.

लोणीकंद पोलीस दिलेल्या माहितीनुसार सिस्का एल इ डी लाईट इयर्स अ हेड, या कंपनीचे एकूण 5 गोडावुन असून सदर ठिकाणी रोहित एंटर प्रायजेस सिक्युरिटी पिंपरी चिंचवड व एस. एस. सिक्युरिटी वाघोली पुणे पुणे यांची सिक्युरिटी आहे. दररोज सकाळी 10.00 ते सायं 7.00 व पर्यंत गोडाऊन चालु असते. सर्व गोडाऊन मध्ये कंपनीचे इलेक्ट्रिक साहित्य असुन गोडावुन बंद करण्याची जबाबदारी संबंधीत मॅनेजरची आहे.  गोडावुन बंद करताना मॅनेजर हे त्यांचे सहीचे सील करुन लॉक करुन गोडावुनची चावी सेक्युरीटी गार्डकडे ठेवुन जात असत.

कैलास देवराम मोरे हे वेअर हाऊस क्रमांक 1 ते 3 चे मॅनेजर असून दिनांक 30.03.2024 रोजी सकाळी 10.30 वा चे सुमारास त्यांनी वेअर हाऊस क्रमांक 01 व 02 चे मुख्य मॅनेजर नामे करूणा पती मिश्रा यांना समक्ष कळविले की, वेअर हाऊस क्रमांक 03 चे शटरच्या लॉकचे सिल मध्ये फरक दिसून येत आहे. तेव्हा मुख्य मॅनेजर करूणा पती मिश्रा यांनी कैलास देवराम मोरे यांना गोडावून उघडून आतमध्ये असलेला माल चेक करा कळविले. तेव्हा मॅनेजर कैलास देवराम मोरे यांनी गोडावून उघडून आतमध्ये प्रवेश करूण पहाणी केली असता आतमध्ये असलेल्या बॉक्सची संख्या कमी होती तसेच बॉक्सच्या जागा बदललेल्या दिसून आल्या.

सदरचा सर्व प्रकार मॅनेजर कैलास देवराम मोरे यांनी मुख्य मॅनेजर के पी मिश्रा यांना समक्ष भेटून कळविला असता त्यांनी इतर वेअर हाऊस मध्ये पहाणी केली असता क्रमांक 04 व 05 चे वेअर हाऊस मधील मालाचे बॉक्स कमी असल्याचे तसेच त्याची जागा बदलल्याचे दिसून आले. मुख्य मॅनेजर करूणा पती मिश्रा यांनी घडलेला सर्व प्रकार सिस्का एल इ डी लाईट इयर्स अ हेड, या कंपनीचे मैनेजमेंन्ट तसेच एम डी नामे राजेश उत्तमचंदानी यांना त्यांचे फोनवर फोन करूण कळविले.

संपूर्ण गोडवूनच्या चाव्या हा सिक्युरिटी गार्ड कडे असल्याने सदर वेअर हाऊसचे सिक्युरिटी गार्ड यांचेकडे विचारणा केली असता सिक्युरिटी गार्ड यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तेव्हा आमची खात्री पटली की आमचे गोडावून मधील साहित्याची कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरी केली आहे. यात जवळपास ५४ लाखांहून अधिक रकमेच्या विद्युत साहित्याची चोरी झाल्याची घटना घडली असून पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पोलीस निरीक्षक कैलास करे, सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे हे पुढील तपास करीत आहेत.