पुणे जिल्हा : इंदापूर आय कॉलेजसमोरील अनाधिकृत होर्डिंग बोर्ड हटवला

– नगरपालिकेने धडक कारवाई करीत उचलले पाऊल, तेवढ्यापुरती कारवाई नको
इंदापूर –
अनाधिकृत होर्डिंग कोसळून अनेकांना जीवाला मुकावे लागले. यामुळे राज्य सरकारने नगरपालिका,गाव पातळीवर तसेच महत्त्वाच्या ठिकाणी धोकादायक असलेले होर्डिंग यामुळे एखादा अपघात किंवा जीवित हानी होऊ नये म्हणून,आदेश जारी केले आहेत.त्यामुळे इंदापूर नगर परिषदेचे प्रशासन खडबडून जागे झाले असून,इंदापूर आय कॉलेजसमोरील असणारे अनधिकृत होर्डिंग तात्काळ हटवण्यामध्ये प्रशासनाला यश आले आहे.

तसे पाहिले तर इंदापूर शहरात राजकीय व्यक्तींनी, अनधिकृत होर्डिंग लावून,शहराचे विद्रूपी करून करून सोडले आहे.वर्षभर लोकांची,नागरिकांची, इच्छा नसताना,हे होर्डिंग लावले जातात.मात्र राज्य शासनाचा आदेश आल्यामुळे,एक-दोन होर्डिंग काढून कारवाई केल्याचा नुसता भास करण्यासाठी कांगावा,नगरपालिकेच्या प्रशासनाने देखील नुसता करू नये.अशी अपेक्षा इंदापूरकरांची आहे. नुकतेच इंदापूर शहरात विना परवना लावण्यात आलेले होर्डिंग बोर्ड इंदापूर नगर परिषदेच्या वतीने काढण्याची मोहीम सुरू केली आहे. यामध्ये,शहरात महत्त्वाचा समजला जाणारा बाबा चौक येथील इमारतीवरील दोन बोर्ड होर्डिंग,आय कॉलेज समोरील दोन तहसील कार्यालय शेजारील एक असे अवघे पाच होर्डिंग काढण्याचे समजते.

इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांचे मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली असून,सिटी इंजिनियर शिवदत्त भोसले,सिव्हिल इंजिनियर प्रसाद देशमुख,अतिक्रमण विभाग प्रमुख योगेश सरवदे,आरोग्य विभाग मुकादम दत्तात्रय ढावरे तसेच आरोग्य विभागाचे व विज विभागाचे सर्व कर्मचारी हे या मोहिमेत सहभागी होते.

 “तेवढ्यापुरती कारवाई नको”.
इंदापूर शहरातील एखाद्या गरीबाचे होर्डिंग काढून हा प्रश्न सुटणार नाहीत.जे धन दांडगे आहेत,राजकारणी आहेत.जणू काही त्यांनी स्वतःच्या मालकीची जागा विकत घेतली आहे असा असा आव आणून,बारा महिने बेकायदेशीर होर्डिंग लावले जातात यावर नगरपरिषद आळा घालणार का ? असाही सवाल नागरिक करत आहेत.शासनाचा आदेशाला म्हणून तेवढ्यापुरती कारवाई करू नका,शहरात प्रत्येक गोष्टीपासून नागरिकांना आनंद मिळावा असे काम प्रशासनाने करावे, अशीही अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.