पुणे जिल्हा: आव्हाळवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी विलास सातव बिनविरोध

वाघोली : आव्हाळवाडी तालुका हवेली या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी विलास सातव पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बिनविरोध निवडीबद्दल विलास सातव पाटील यांचा भारतीय जनता पार्टी चे महाराष्ट्र राज्य प्रदेश युवा मोर्चा सचिव गणेश कुटे, आव्हाळवाडी ग्रामपंचायत सदस्य शरद आव्हाळे, माजी उपसरपंच विक्रम कुटे, माजी उपसरपंच राहुल सातव पाटील, बबन सातव पाटील, युवा उद्योजक विशाल कुटे, अविनाश कुटे, विजय आव्हाळे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आव्हाळवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेणारे विजय आव्हाळे यांच्यावर देखील सर्वत्र स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.