Pune: पुनर्वसन केलेल्या बालकांना शिक्षणासाठी मदत

पुणे – पुनर्वसन केलेल्या बालकांना बजाज संस्थेच्या वतीने शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. यावेळी मुलांना शालेय साहित्यासह शाळेची फी भरण्यासाठी आर्थिक मदतही करण्यात आली. हा कार्यक्रम विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय येथे पार पडला.

पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, विभागीय सुरक्षा आयुक्त (रेल्वे सुरक्षा दल) आणि साथी संस्था यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह, विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योति मनी, बजाजच्या व्यवस्थापक लिना राजन, योजना पळसे, बाल कल्याण समितीच्या सारिका अगज्ञान, साथी संस्थेचे डायरेक्टर बसवराज शाली, बोर्ड मेंबर डॉ. विनीत रायचूर यासह मुले आणि पालक उपस्थित होते.

रेल्वे स्थानकात हरवलेले, घरातून पळून आलेले तसेच विनापालक आढळून आलेल्या बालकांना साथी संस्था बाल कल्याण समितीच्या आदेशाने त्यांच्या घराचा शोध घेऊन त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करते. यावेळी मुले आणि पालकांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन समुपदेशक अनिता वायळ तर समन्वयक राजविर सिंह यांनी आभार मानले.