पुणे : आजही फक्‍त कोवॅक्‍सिनचेच डोस

पुणे-करोना प्रतिबंधक लसीचे सोमवारी केवळ कोवॅक्‍सिन डोस उपलब्ध असून, तेही 11 केंद्रांवर मिळणार आहेत. या प्रत्येक केंद्रांवर प्रत्येकी 140 डोस उपलब्ध करून आहेत.

18 वर्षांवरील सर्व नागरिकांना सोमवारी कोवॅक्‍सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 15 टक्‍के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 15 टक्‍के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.

याशिवाय 9 ऑगस्टला कोवॅक्‍सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्या 18 वर्षांवरील नागरिकांना सोमवारी 35 टक्‍के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे, तर 35 टक्‍के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.

डोस मिळण्याची केंद्र
औंध – औंध कुटी रुग्णालय
वानवडी – कै. नामदेवराव शिवरकर दवाखाना
नगररस्ता – कै. दामोदर रावजी गलांडेपाटील दवाखाना
मंगळवारपेठ – कमला नेहरू रुग्णालय
ताडीवाला रस्ता – डॉ. नायडू सांसर्गिंग रुग्णालय
येरवडा- राजीव गांधी रुग्णालय
कोथरूड- कै. जयाबाई सुतार दवाखाना
कर्वेनगर- कै. बिंदूमाधव ठाकरे दवाखाना
गाडीखाना- कै. मालती काची दवाखाना
महंमदवाडी- कै. दशरथ भानगिरे दवाखाना
ससून सर्वोपचार रुग्णालय