पुणे! विभागात करोनामुक्‍ती दर वाढला

आतापर्यंत 17 लाख 70 हजार व्यक्‍ती करोनामुक्‍त

पुणे – विभागातील करोनामुक्‍ती दरामध्ये मागील पंधरा दिवसांत वाढ झाली आहे. 95 टक्‍क्‍यांपर्यंत असालेला बाधित दर शनिवारी जवळपास 96 टक्‍क्‍यांवर आला आहे. पुणे विभागातील 18 लाख 45 हजार 814 बाधितांपैकी आतापर्यंत 17 लाख 70 हजार 892 रुग्ण बरे झाले आहेत. तर, 36 हजार 857 सक्रीय बाधित संख्या आहे.

करोनामुळे आतापर्यंत 38 हजार 65 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्‍के आहे.
विभागात शनिवारची बाधित आणि करोनामुक्त संख्या सोडली तर, मागील काही दिवसांपासून बाधितांपेक्षा करोनामुक्‍त झालेल्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे 95 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आलेले करोनामुक्‍तीचे प्रमाण 96 टक्‍क्‍यांवर आले आहे.

गेल्या 24 तासांत विभागात 3 हजार 479 करोनामुक्‍त झाले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 640, सातारामध्ये 675, सोलापूर 501, सांगली जिल्ह्यात 837 आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 826 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आजपर्यंत विभागामध्ये एकूण 1 कोटी 27 लाख 75 हजार 980 नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी 18 लाख 45 हजार 814 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.फ