Pune: पीएमपीतही महिलांना मोफत बससेवा

पुणे – पीएमपीच्या महिला विशेष बसमधून महिलांना आता मोफत प्रवास करता येणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून जागतिक महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी ही मोफत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दि. 8 मार्च रोजी शहरातील 17 मार्गावर दिवसभर ही मोफत सेवा दिली जाणार असून, महिलांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या मार्गावर महिला विशेष बसमधून मोफत सेवा देण्यात येणार आहे. स्वारगेट ते हडपसर (३०१), स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर (११७), शनिवारवाडा ते केशवनगर मुंढवा (१६९), कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन (९४), एनडीए गेट क्र.१० ते मनपा (८२), कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड (२४), कात्रज ते कोथरूड डेपो (१०३), हडपसर ते वारजे माळवाडी (६४), भेकराईनगर ते मनपा (१११), हडपसर ते वाघोली (१६७), अप्पर डेपो ते शिवाजीनगर (१३), मार्केटयार्ड ते पिंपळेगुरव (११), पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द (१७०), आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपा (३२२), निगडी ते मेगा पॉलीस हिंजवडी (३७२), भोसरी ते निगडी (३६७) चिखली ते डांगे चौक (३५५) या मार्गाचा समावेश आहे.