Pune : धुलिवंदनानिमित्त सोमवारी मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला, फुले, केळी आणि पान विभाग बंद

पुणे, दि. 26 – सोमवारी (दि.29) धुलिवंदन आहे. या दिवशी दरवर्षीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला, फुल, केळी आणि पान बाजार बंद असतो.

त्यानुसार यंदाही बंद राहणार आहे. तरीही शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणू नये, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसचिव सतिश कोंडे यांनी केले आहे.

Leave a Comment