Pune: कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग

पुणे:  राज्यसह देशभरात गाजलेल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास अखेर सहा दिवसानंतर पुणे गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. रविवारी (दि १९ ) झालेल्या अपघातात अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने मोटार चालून दोघा अभियंताचा जीव घेतला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

याप्रकरणी येरवडा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. मात्र अपघात प्रकरणात राजकीय हस्तक्षेपमुळे पोलिसांवरील दबाव वाढत होता. कल्यानीनगर अपघात प्रकरण तपास येरवडा पोलिसांकडून सहा दिवसांनी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

दरम्यान, अपघातानंतर नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यामुळे वाढता दबाब टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी हा तपास गुन्हे शाखेकडून करण्याचा निर्णय घेतला. अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे हे या प्रकरणाचा तपास करनार आहेत.