Pune जेईई अॅडव्हान्सचा निकाल आज

पुणे –  आयआयटी, एनआयटी प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्‍या जेईई अॅडव्हान्सचा निकाल उद्या, दि. ९ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्सच्‍या अधिकृत संकेतस्‍थळावरुन निकाल उपलब्ध होणार आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या वतीने (आयआयटी मद्रास) घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल विद्यार्थी आॅनलाइन पाहू शकतात. निकालाची लिंक उद्या सकाळी 10 वाजल्यापासून खुली होणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यांसारखी त्यांची लॉग-इन वापरणे आवश्यक असणार आहे.

निकालात विद्यार्थ्यांचे विषयवार गुण आणि पेपर 1 आणि पेपर 2 चे एकूण गुण असणार आहे. ऑल इंडिया रँक आणि पात्रता स्थिती देखील निकालात नमूद केली जाणार आहे.