पुणे | वडगावशेरीत शनिवारी कायदे विषयक जनजागृती शिबिर

पुणे – पॅन इंडिया विधी साक्षरता अभियान अंतर्गत वडगावशेरी येथे उद्या (दि. 13) कायदेविषयक शिबिर होणार आहे. येथील विठ्ठलवाडी मम्गल कार्यालय येथे सायंकाळी 6.30 वाजता हे शिबिर होणार आहे. 

यास प्रमुख जिल्हा न्यायाधीश आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय देशमुख, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत उपस्थित राहणार आहेत. 

यावेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सतीश मुळीक हे “महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम व घरांचे नियमितीकरण’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.  तर, माजी जिल्हा सरकारी वकील विजय सावंत हे “शिक्षण हक्क व कायदे’ या विषयावर बोलणार आहेत. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या शिस्तपालन समितीचे सदस्य अॅड. पंडित कापरे करणार आहेत. अध्यक्ष सतीश मुळीक, नारायण गलांडे, सचिन भगत आणि देविदास गलांडे हे कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.