पुणे | भारती विद्यापीठ पोलिसांचा रुट मार्च

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत दक्ष राहात तसेच गुन्हेगारीवर वचक रहावा या उद्देशाने रूटमार्च काढण्यात आला.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अधिकाऱ्यांना रूटमार्ट काढण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान शहरातील गुन्हेगारीं च्या घटना वाढत असल्याचं चित्र आहे, अशा घटनांना लगाम घालण्यासाठी आता पोलिसांकडून पाउलं उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीचा विचार करत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत दक्ष राहत भारती विद्यापीठ पोलीस गस्त घालत आहेत.

कात्रज चौकी, कात्रज भाजी मंडई, आनंद दरबार, सच्चाई माता परिसर, दत्तनगर चौक, शनीनगर, दत्तनगर चौकी पर्यंत तर सायंकाळच्या सत्रात भारती विद्यापीठ पोलीस चौकी, भारती विद्यापीठसह आंबेगाव पठार परिसरात रुट मार्च काढत जनतेला शांततेचा संदेश देण्यात आला . वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि पोलीस पथकाने नागरिकांना शांतता राखण्याचा संदेश दिला.