Pune : महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस आयुक्तांचा पुढाकार; नागरिकांना व्हॉट्सअॅपवर सूचना पाठविण्याचे आवाहन

पुणे – शहरात सदाशिव पेठेत घडलेल्या घटनेनंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महिलांच्या सुरक्षेसंदर्भात एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी 8975953100 हा व्हॉटस्‌ अप नंबर जाहीर केला असून त्यावर महिलांच्या सुरक्षेसंदर्भात सूचना आणि अभिप्राय देण्याचे आवाहन केले आहे. त्यासोबत इतर घटनांचा आढावा घेऊन सूचनांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच तातडीच्या सेवेसाठी 112 नंबरवर संपर्क करावा, असे सांगितले आहे.

यासंदर्भात सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले की, यानंबरवर व्हॉटस्‌ऍपवर पुणेकर नागरिक महिलांच्या सुरक्षेसंदर्भात सूचना देऊ शकतात. यावर प्राप्त तक्रार व मेसेज संबंधित पोलीस स्टेशन, दामिनी पथक आणि गुन्हे शाखेचे पथक यांच्याकडे देण्यात येतील. या मेसेजच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईवर पोलीस आयुक्त कार्यालयातून देखरेख ठेवली जाईल. नागरिकांशी मैत्रीपूर्व अभिप्राय उपक्रम राबवावा, अशा हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. आपण त्यांच्या गरजा आणि समस्या जोपर्यंत जाणून घेऊन शकत नाहीत. तोपर्यंत त्यावर उपाय शोधू शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांचा सहभाग घेण्यात आला आहे.

शहरात युपीएससी परीक्षा पास झालेल्या एका तरुणीचा तीच्या मित्राने राजगडला नेऊन खून केला होता. या घटनेनंतर संगणक अभियंता असलेल्या महिलेवर रिक्षा चालकाने आडबाजूला नेऊन अतिप्रसंग करण्याची घटना घडली. तर नुकतीच एका तरुणीच्या मागे तिचा माजी प्रियकर कोयता घेऊन मागे लागलेली घटना घडली. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी तिचे प्राण वाचवल्यावर ही घटना देशभर चर्चीली गेली होती.