Pune: धायरीतील ड्रेनेजलाइनची दुरूस्ती

धायरी -सिंहगड रस्त्यावरील धायरी येथील बेनकर वस्ती व परिसरात गेली १५ दिवस ड्रेनेजलाइन तुंबल्याने दुर्गंधी पसरल्याचे तसेच सांडपाण्याची डबकी साचून रस्ता निसरडा होत असल्याबाबतचे वृत्त प्रभातमध्ये प्रकाशीत करण्यात आले होते. यानंतर पालिका प्रशासनाची गडबड उडाली. तातडीने ड्रेनेजलाइनची दुरुस्ती झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी दिला होता.

महापालिका क्षेत्रिय कार्यालयाने त्यानुसार पारी कंपनी जवळील रस्त्यावर ड्रेनेजच्या दुरस्तीचे काम सुरू केले. प्रभातमध्ये येथील समस्येसंदर्भात वृत्त प्रकाशीत झाल्याने प्रशासनामध्ये सूत्रे हलली आणि त्वरित कामाला सुरुवात झाली. या संदर्भात आम आदमी पक्षाचे धनंजय बेनकर यांनी आणि परिसरातील नागरिकांनी प्रभातचे आभार मानले.