पुणे : महापालिकेने वाढविल्या चाचण्या

डाॅ. भगवान पवार ; नागरिकांनी घाबरु जाऊ नये
पुणे –
कोविडच्या जे एन.वन या विषाणूची लागण झालेला रूग्ण राज्यात आढळल्याने महापालिकेकडून शहरातील आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. साठी शहरातील रूग्णालयांना सूचना देण्यात आल्या असून संशयित रूग्णांच्या चाचण्या वाढविण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य प्रमुख डाॅ. भगवान पवार यांनी दिली. तसेच, खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेकडून मॉक ड्रील घेऊन आरोग्य यंत्रणेची सक्षमता तपासण्यात आली आहे. नागरीकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन डाॅ. पवार यांंनी केले आहे.

या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आरोग्य यंत्रणांची तातडीची बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरीक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ.भगवान पवार यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

शहरात सात सक्रीय रूग्ण…
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शहरात कोविड सक्रीय रूग्णांची संख्या सात असून दर आठवड्याला १५० चाचण्या केल्या जात आहेत. एका रूग्णाचा जिनोम सिक्वेंसिंगसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. खाटा, आयसीयू सुविधा, ऑक्सिजन,औषधसाठा, मनुष्यबळ यांचा आढावा घेण्यात आला असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.