पुणे : मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढावा

पुणे . मतदान प्रकियेत १८ ते १९ आणि २० ते २९ या या वयोगटातील युवकांचा सहभाग लोकसंख्येच्या प्रमाणात कमी आहे, यावर विशेष लक्ष देण्याची गरज असून याकामी सर्व मतदान केंद्रांना मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी स्वतः भेटी देऊन पडताळणी करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त तथा पुणे विभागासाठीचे मतदार यादी निरीक्षक सौरभ राव यांनी दिल्या.

मतदार यादीतील दुबार व मयत, नावे, पत्ता व छायाचित्रे समान असलेली नावे कमी करण्याची प्रक्रिया राबवावी. मतदार यादीतील तपशीलातील दुरुस्ती करुन ती अद्ययावत करावी, असेही आदेश राव यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा बैठकीच्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार ॲड. अशोक पवार, उपायुक्त महसूल रामचंद्र शिंदे, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त राव म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात यावी. यासाठी विविध राजकीय पक्ष, प्रसार माध्यमे, सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. ‘स्वीप’ कार्यक्रमाअंतर्गत मतदार संघनिहाय मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन करावे. नवीन युवा मतदारांची अधिकाधिक प्रमाणात नोंदणी होण्याच्याष्टीने मोहिमस्तरावर काम करावे.

मतदार नोंदणीकरीता अनिवासी भारतीय नागरिकांच्या बाबतीत संबंधित कंपन्यांशी संपर्क साधून शिबीरे आयोजित करावीत. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत संपर्क साधावा. महिला, शरीर विक्रय व्यवसाय करणाऱ्या महिला, तृतीयपंथीय, दिव्यांग, भटक्या विमुक्त जाती जमाती, आदी घटकांतील नागरिकांची मतदार नोंदणी करावी. मतदार यादीत समाजातील सर्व घटकांचा समावेश होईल, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही विभागीय आयुक्त राव यांनी दिल्या.

राजकीय पक्षाचा सहभाग सक्रीय
सहभागी करून घ्यावे .अशा सूचना विभागीय आयुक्त राव यांनी दिल्या. राजकीय पक्षांनी आपल्यास्तरावर असलेल्या सूचना किंवा तक्रारी निवडणूक यंत्रणेला कळवाव्यात. या सुचना व तक्रारीची दखल घेऊन संबंधित यंत्रणेने कार्यवाही करावी. सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी याकामी स्वत: वैयक्तिक लक्ष देवून काम करावे, असेही राव यांनी यावेळी सांगितले.