पुणे : दुसऱ्या लाटेतील शहराचा नीचांक; सोमवारचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्के

पुणे – करोनाच्या दुसऱ्या लाटेतील सर्वांत कमी बाधित संख्येची सोमवारी नोंद झाली. गेल्या 24 तासांत करोनाचे नवीन 136 बाधित सापडले. हा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्के राहिला आहे.

सोमवारी दिवसभरात 3 हजार 872 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली. तर, आतापर्यंत 26 लाख 18 हजार 784 जणांची नमुने तपासणी करण्यात आली. त्यातील 4 लाख 75 हजार 990 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर 4 लाख 64 हजार 983 जण करोनामुक्‍त झाले.

आतापर्यंत 8 हजार 537 बाधितांचा करोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, सोमवारी दिवसभरात 223 जण करोनामुक्‍त झाले, तर सक्रिय बाधित संख्या 2 हजार 470 इतकी आहे. त्यातील 359 बाधितांची प्रकृती चिंताजनक असून, 503 बाधितांना ऑक्‍सिजन लावण्यात आला आहे.

गेल्या 24 तासांत करोनामुळे 17 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामध्ये शहर हद्दीतील 6, तर अन्य भागांतील 11 जणांचा समावेश आहे.