PUNE: शहरात दोन अपघातांत दोन जणांचा मृत्यू

पुणे – शहरातील कोरेगाव पार्क आणि येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दुचाकीला पाठीमागून दिलेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. पहिली घटना कोरेगाव पार्क येथील लेन नंबर ३ च्या समोरील सार्वजनिक रोड १९ जानेवारी रोजी मध्यरात्री घडली. टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार डेव्हिड सुलतान शेख ( २५, रा. कोंढवा, खुर्द) असे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अभिजित गुजर (३२, रा. बुलढाणा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सोपान नरळे करत आहेत.

तर, दुसरी घटना कल्याणीनगर जंक्शन चौक येरवडा येथे २० जानेवारी रोजी पहाटे साडेच्या सुमारास घडली. ट्रकने पाठीमागून मारलेल्या धडकेत ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ईशान सुनील करवाडे (३४, रा. वाघोली) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गौरव खंडारे (२४, रा. वाघोली) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील करत आहेत.