Pune: पुणे रेल्वेकडून मेट्रो स्थानकात व्हेंडींग मशीन

पुणे – पुणे रेल्वेकडून मेट्रो स्थानकाच्या गेटवर तिकीट सुविधेसाठी व्हेंडींग मशीन बसविण्यात आली. त्यामुळे मेट्रोतून उतरल्यावर प्रवशांना रेल्वे पादचारी पुलावर जाण्याअधीच फ्लॅटफाॅर्म तिकिट किंवा रेल्वे प्रवासाचे तिकिट काढणे सोपे झाले आहे. आता, महामेट्रोचे रेल्वे स्थानक परिसरात तिकीट मशीन कधी बसणार याची प्रतिक्षा आहे.

वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गावर पुणे रेल्वे स्थानकालगत मेट्रो स्टेशन आहे. या मेट्रो स्टेशन येथून प्रवाशांना थेट पुणे रेल्वे स्टेशन येथे प्रवेश मिळतो. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना मेट्रोतून उतरल्यावर पादचारी पुलावरून थेट फ्लॅटफाॅर्मवर जाता येते. मात्र, मेट्रोचे बरेच प्रवासी पुणे रेल्वे स्टेशन येथील पादचारी पूल वापरून समोरच्या बाजूला जातात. पुणे रेल्वे स्टेशन येथून जाताना रेल्वेचे तिकीट अथवा प्लॅटफॉर्म तिकीट असणे आवश्यक असते.

मात्र, प्रवासी रेल्वेचे तिकीट न घेताच पादचारी पुलाचा वापर करतात. त्यामुळे रेल्वेच्या तिकिट तपासणी अधिकाऱ्यांवर प्रवाशांवर कारवाई केली जाते. त्यानुसार प्रवाशांना फ्लॅटफाॅर्म तिकीट मिळण्यासाठी मेट्रो स्थानकाच्या गेटवर व्हेंडिग मशीन बसविली आहे. त्यामुळे प्रवाशांना फ्लॅटफाॅर्म तिकिटासाठी कसरत करावी लागणार नाही.

मेट्रोचे क्युआर कोडही लावणार …

रेल्वे प्रशासनाकडून मेट्रो स्थानक परिसरात व्हेंडिंग मशीन बसविण्यात आले. आता, मेट्रोकडून रेल्वे स्थानक परिसरात व्हेंडींग मशीन कधी बसणार. मेट्रो प्रशासनाने रेल्वे स्टेशनच्या परिसरात दोन ते तीन ठिकाणी तिकीट व्हेंडींग मशीन बसविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. तसेच, रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी मेट्रोचे क्युआर कोड लावले जाणार आहे.