PUNE: कारागृहातील बंद्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरंसिंग सुविधा

पुणे – मुंबई मध्यवर्ती कारागृह येथे बंद्यासाठी स्मार्टकार्ड दूरध्वनी योजना व व्हिडिओ कॉन्फरंसिंग युनिटचे उद्घाटन गृह विभागाच्या प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) राधिका रस्तोगी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता, कारागृह उपमहनिरीक्षक योगेश देसाई (दक्षिण विभाग, भायखळा मुंबई) तसेच स्मार्टकार्ड सुविधा पुरवठा करणाऱ्या अॅलन ग्रुपचे योगिंद्र रेड्डी, कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग) महेंद्र पाटील उपस्थित होते.

सर्वप्रथम नवीन व्ही. सी. युनिटचे आणि नंतर स्मार्ट कार्ड दूरध्वनी यंत्रणेचे उद्घाटन झाले. यावेळी बंदी बांधवांनी स्मार्ट कार्डचा वापर करून आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधला. यावेळी आयोजित कार्यक्रमात अमिताभ गुप्ता यांनी प्रमुख आतिथींचे रोप आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

त्यानंतर प्रमुख अतिथी राधिका रस्तोगी यांनी बंदी बांधवांना मार्गदर्शन केले. कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. तसेच कार्यक्रमानंतर विनोद शहा के. गिरधरलाल इंटरनॅशनल प्रा. ली. यांचेकडून रक्त तपासणी यंत्र बंद्यांसाठी कारागृहास भेट देण्यात आले. यावेळी 350 बंदीजण सहभागी होते.