राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत पुण्याचे यश

पुणे – मध्य प्रदेशमध्ये पार पडलेल्या 36 व्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंनी देदीप्यमान यश मिळवले. पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेशी संलग्न असलेल्या या खेळाडूंनी पदके मिळवताना आपली निवड सार्थ ठरवली.

शुभंकर खवले ने प्रथमच खुल्या गटात खेळताना वैयक्तिक विजेतेपद पटकावले. त्याने वैयक्तिक व सांघिक गटात तब्बल 4 सुवर्णपदके प्राप्त केली. त्याच्यासह सर्व गटातील सरस कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार रविवारी महाराष्ट्रीय मंडळ टिळक रोड येथे करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष सचिन पुरोहित यांनी पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय

स्पर्धेत विशेष चमक दाखवणाऱ्या खेळाडूला कै. शरद पुरोहित यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारी 25 हजार रुपयांची शिष्यवृत्ती राष्ट्रीय विजेता शुभंकर खवले याला प्रदान केली. यावेळी संघटनेचे सचिव सचिन परदेशी, वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र पेठे, विकास फाटक, सहसचिव चिन्मय पाटील, सदस्य सुवर्णा शिदोरे, अभिजित भोसले तसेच अन्य सदस्य व पालक उपस्थित होते.

संक्षिप्त निकाल

14 वर्षांखालील मुले

वेदांत काकडे – सांघिक सुवर्ण

18 वर्षांखालील मुले, 

अमेय सूर्यवंशी – सांघिक रजत

18 वर्षांवरील मुले

ऋषिकेश अरंकल्ले – सांघिक सुवर्णं, शुभकर खवले – 4 सुवर्ण.