पंजाब संघ देणार मॅक्‍सवेलला डच्चू

नवी दिल्ली – अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेत सातत्याने अपयशी ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्‍सवेल याला पुढील मोसमातून किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ डच्चू देणार असल्याचे सांगितले जात आहे. पुढील मोसमासाठी होत असलेल्या लिलाव प्रक्रियेत मॅक्‍सवेलला रिलीज करण्यात येणार आहे. 

यंदाच्या स्पर्धेत मॅक्‍सवेलने जवळपास 11 कोटी रुपयांचा करार मिळवला होता. त्याला इतक्‍या मोठ्या रकमेचा करार देऊनही पंजाबकडून खेळताना त्याला एकाही सामन्यात संघाच्या विजयात वाटा उचलता आला नाही. त्याच्या अपयशामुळेच पंजाबला अनेक सामन्यांत अपयशाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता पुढील मोसमासाठी जेव्हा लिलाव होईल त्यावेळी त्यात मॅक्‍सवेल अन्य संघांसाठी उपलब्ध होणार आहे.

मॅक्‍सवेलसह वेस्ट इंडिजचा शेल्डन कोट्रेल यालाही संघातून रिलीज करण्यात येणार आहे. कर्णधारपद लोकेश राहुलकडेच कायम राहणार असून मुख्य प्रशिक्षकपदी अनील कुंबळेंना कायम ठेवण्यात येणार आहे. तसेच ख्रिस गेल, निकोलस पूरन, मयंक आग्रवाल, महंमद शमी व रवी बिश्‍नोई या खेळाडूंचे संघातील स्थान कायम राहणार असून संघ बांधणीही नव्याने होणार आहे.

Leave a Comment