विविध स्पर्धांमधून निसर्गाचा जागर

वाल्हे,(वार्ताहर) – पिंगोरी (ता. पुरंदर) येथील इला हॅबीटॅट येथे निसर्ग संवर्धन, शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि आरोग्य या विषयांवर काम करणार्‍या केंद्राचा दशकपूर्ती समारंभ आयोजित नुकताच करण्यात आला होता.

यानिमित्त शालेय स्तरावर चित्रकला, निबंध, वक्तृत्व या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

याप्रसंगी वनविभागाचे सेवानिवृत्त अधिकारी डॉ. अरविंद कुमार झा, आडाचीवाडी सरपंच सुवर्णा पवार, दौंडजच्या सरपंच सीमा भुजबळ, उपसरपंच भाग्यश्री शिंदे, माजी सरपंच जीवन शिंदे, हमीद शेख, शांताराम राणे यांच्यासह वाघेश्वरी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशने महाराष्ट्रात वन्यजीव व सर्परक्षणामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल फैय्याज शेख, आयुब खान, सुशील विभुते, प्रशांत बोरावके यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

स्पर्धेनिहाय विजेते :
वक्तृत्व : वेदांत ताकवले (जेजुरी), आर्या रेवगे (दौंड), कार्तिकी साळुंखे (मांडकी).
चित्रकला : ओवी मणेरे (जेजुरी)-रूद्रांश पवार (हनुमानवस्ती), आर्यन ठोंबरे (मांडकी)-इशिता भोसले (जेजुरी), ईश्‍वरी रोमन- स्वराज साळवे (दोघे जेजुरी).
निबंध (मोठा गट) : श्रवणी झगडे (कोळविहिरे), तन्वी पापळ, (मांढर), रोशनी जगताप (माहूर). लहान गट : पौर्णिमा थोपटे (पिंपरे खुर्द), क्रांती चांदगुडे (बर्‍हाणपूर), अनुष्का गिरमे (कटफल).