राधाकृष्ण विखेंचा उमेदवारी अर्ज धोक्यात…?

मुंबई: राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु झाली असून. राज्यात सुमारे ४ हजार उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या सर्व उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी करण्यास शनिवार पासून सुरवात झाली आहे. त्यामध्ये भाजपाचे शिर्डी विधानसभेचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विखे यांना भाजपने उमेदवारी दली असून त्यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून शुक्रवारी (4 ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी अर्जामध्ये स्वतःसह अन्य प्रतिनिधींचे 3 असे एकुण 4 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. परंतु अर्ज दाखल करताना विखेंनी ज्या वकिलाकडून प्रतिज्ञापत्र तयार करून घेतले होते, त्या वकिलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकारच नसल्याचा दावा विरोधकांनी केल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विखे यांनी नोटरी करून दिलेल्या प्रमाणपत्रावरच काँग्रेसने आक्षेप घेतला असून. याबाबत शिर्डी विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जर विखे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला तर तो भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Comment