‘या’ दिवंगत काँग्रेस नेत्याच्या घरामध्ये राहणार राहुल गांधी ! लवकरच 3 बीएचके’मध्ये होणार शिफ्ट

नवी दिल्ली- कॉंग्रेस नेते राहुल गांधी लवकरच दक्षिण दिल्लीतील निजामुद्दीन पूर्वेकडील घरात शिफ्ट होणार आहेत. ते तीन बेडरूम, 1 हॉल आणि 1 किचन (3बीएके) असलेल्या घरात राहतील. या वर्षी एप्रिलपर्यंत ते नवी दिल्लीतील तुघलक लेन भागातील सरकारी बंगल्यात राहत होते. त्या बंगल्यात ते 19 वर्षे राहिले, पण खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांना तो रिकामा करावा लागला.

राहुल ज्या घरात शिफ्ट होणार आहेत ते दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसच्या दिवंगत नेत्या शीला दीक्षित यांचे आहे. राहुल यांचे नवीन घर 1500 स्क्वेअर फुटांचे आहे. या घरातून हुमायूनचा मकबरा दिसतो आणि थोड्याच अंतरावर निजामुद्दीन औलियाचा दर्गा आहे.

डिसेंबरमध्ये राहुल दिल्लीला आले होते तेव्हा त्यांनी या दर्ग्यालाही भेट दिली होती. वृत्तानुसार, राहुल लवकरच आपल्या नवीन निवासस्थानी शिफ्ट होणार आहेत. 1991 ते 1998 या काळात कॉंग्रेस नेत्या शीला दीक्षित या घरात राहत होत्या.

त्यानंतर 2015 ते 2019 पर्यंत त्या इथेच राहिल्या. अलीकडेच त्यांचा मुलगा संदीप दीक्षित यांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांना नोटीस बजावत हा फ्लॅट रिकामा करण्यास सांगितले आहे.