रेल्वेचा “ट्विटर’ दिलासा

महालक्ष्मी एक्‍स्प्रेस अडकल्याने तातडीने “अपडेट्‌स’ 

पुणे – रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने मुंबई ते कोल्हापूर धावणारी महालक्ष्मी एक्‍स्प्रेस वांगणी परिसरात अडकली. या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर मदत कार्य हाती घेण्यात आले होते. मात्र, रेल्वेत अडकलेल्या या प्रवाशांच्या मदतीला ट्विटर ही धावून आले. सद्यस्थिती, अडकलेले प्रवासी, त्यांची सद्यस्थिती, मदत कार्य आणि एकूणच प्रशासन आणि प्रवाशांच्या हालचाली याबाबत महत्त्वाची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली जात होती.

वारंवार मार्ग बदलण्यात आलेल्या गाड्यांची माहिती, रद्द करण्यात आलेल्या गाड्या, बचाव कार्याची माहिती आदी तपशिल ट्विट करण्यात येत होते. शनिवारी सायंकाळपर्यंत सुमारे साडेबारा हजारांपेक्षा जास्त जणांनी “महालक्ष्मी एक्‍स्प्रेस’ या हॅशटॅगद्वारे, तर सुमारे साडेबारा हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी “एनडीआरएफ’ या हॅशटॅगद्वारे आणि सुमारे 3 हजार जणांनी “बदलापूर’ या हॅशटॅगद्वारे ट्‌विट केले. अडकलेल्या प्रवाशांना एनडीआरएफ आणि नौदलाच्या सहाय्याने प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

मात्र, या दरम्यान अनेक नागरिकांनी रेल्वे प्रशासनाला “ट्विटर’द्वारे परिस्थितीची अधिक माहिती देत सहकार्य केले. त्यामुळे प्रशासनाला मदत झाली. रेल्वेकडे येणाऱ्या “ट्‌विट’ला देखील रेल्वे प्रशासनाने उत्तर दिले. “थॅंक्‍स टू एनडीआरएफ’, “आम्ही सुखरुप आहोत’, “आमचा परिवार सुखरूप आहे’ असे ट्विट करत नागरिकांनी यंत्रणांचे कौतुक केले.

Leave a Comment