राज्यात दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात “यलो अलर्ट’ जारी

Weather Alert Rain Update – दोन दिवस (9 आणि 10 मे) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

9 मे रोजी पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जन ा आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होईल. तसेच अहमदनगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

10 मे रोजी पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, नांदेड, लादूर, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासाह मेघ गर्जना व वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.