Rain Update: महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तरेकडील भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबई  – नैऋत्य मोसमी पाऊस मध्यवर्ती अरबी समुद्र, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणचे आणखी काही भाग आणि दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण ओदिशाचे काही भाग आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या आणखी काही भागात आज ८ जून रोजी पुढे सरकला आहे.

मध्यवर्ती अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये, महाराष्ट्र (मुंबईसह) आणि तेलंगणच्या आणखी काही भागात पुढील २-३ दिवसात नैऋत्य मोसमी पावसाला आगेकूच करण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. महाराष्ट्र ते उत्तर केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.

या प्रभावाखाली पुढील पाच दिवसात कोकण आणि गोव्यात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक आणि केरळ, माहे, लक्षद्वीप मध्ये बऱ्याच भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह(40-50 किमी/तास) हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता, आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि याणम्, रायलसीमा, तेलंगण, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि काराईकलमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी १२ जून रोजी मुसळधार ते अतिमुसळधार, १० ते १२ जून दरम्यान केरळ आणि माहेमध्ये, ८ ते १० जून दरम्यान दक्षिण कर्नाटकच्या अंतर्गत भागात; मराठवाडा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल आणि तेलंगणमध्ये ८ ते १० जून दरम्यान, मध्य महाराष्ट्रात ९ ते ११ जूनदरम्यान, कर्नाटक किनारपट्टीवर ८ ते ९ जून दरम्यान आणि उत्तरेकडील कर्नाटकच्या अंतर्गत भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

ईशान्य मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगालचा गंगेच्या खोऱ्यातील भाग या ठिकाणी तुरळक क्षेत्रात ८ ते १२ जूनदरम्यान, ओदिशा, पंजाब,हरयाणा येथे ९ ते १२ जून दरम्यान, जम्मू काश्मीर लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश येथे १० ते १२ जून दरम्यान उष्णतेची लाट असेल.