लोकसभेत मोदींना बिनशर्त पाठिंबा, कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीचे आदेश; राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Raj Thackeray Speech । लोकसभा निवडणुकांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेणार? याबाबतची उत्सुकता लागून राहिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी, दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे निवडणूक चाणक्य अमित शहा यांची घेतलेली भेट यांमुळे राज ठाकरे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीमध्ये सहभागी होणार अशाही चर्चा रंगल्या होत्या.

महायुतीमध्ये सहभागी झाल्यास मनसेला किती जागा? मनसेचा अमुक जागांचा प्रस्ताव, भाजपकडून तमुक जागांची ऑफर अशाही बातम्यांनी माध्यमांमध्ये जोर धरला होता. खुद्द मनसे कार्यकर्त्यांमध्ये देखील ‘नक्की काय घडतंय’ याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते.

अशातच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल  मुंबईतील मैदानावर पक्षाचा गुढीपाडवा मेळावा घेतला. या मेळाव्यातून मनसे कार्यकर्त्यांना संबोधित करताना, पक्षाची पुढील दिशा काय असणार? याबाबत मार्गदर्शन केले. ( Raj Thackeray Speech )

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? Raj Thackeray Speech । 

>> भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांचे निवडणूक आयोगावर ताशेरे. डॉक्टर व नर्सेसना इलेक्शन ड्युटी लावल्यावरून सुनावले.

>> डॉक्टर व नर्सेसने इलेक्शन ड्युटीवर जाऊ नये, मी बघतो कोण तुम्हाला नौकरीवरून काढतो – राज ठाकरेंचा एल्गार

>> अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्लीत १२ तास वाट पाहावी लागली, अशा वावड्या माध्यमांनी उडवल्या – राज ठाकरेंचा आरोप

>>> राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार अशी वृत्त दिलं, शिवसेना प्रमुख व्हायचं असत तर तेव्हाच झालो असतो – राज ठाकरे 

>>> बाळासाहेबांशिवाय कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही, अशी खूणगाठ मनाशी बांधली होती. त्यामुळेच स्वतःच पक्ष काढला – राज ठाकरे 

>>> अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जागावाटपाची चर्चा झाली – राज ठाकरे

>>> भाजपने त्यांच्या चिन्हावर लढण्याची ऑफर दिली. ती मी नाकारली. रेल्वे इंजिन या चिन्हावर तडजोड नाही – राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

>>> बाळासाहेब १९८० साली इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेलेले, भेटीसाठी जाण्यात कमीपणा कसला – राज ठाकरे

>>> शिवसेना-भाजप युतीमुळे भाजपसोबत जवळचे संबंध – राज ठाकरे

>>> देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत हे बोलणारा राज ठाकरे पहिला माणूस – राज ठाकरेंचे वक्तव्य

>>> ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन केले – राज ठाकरे

>>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर संजय राऊत, उद्धव ठाकरे ज्या भाषेत टीका करतात, तशी मी केलेली नाही – राज ठाकरे

>>> बाकी सगळं सोडून तरुणांकडे लक्ष द्या, ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अपेक्षा – राज ठाकरे

>>> येणारी लोकसभेची निवडणूक देशाचे भविष्य ठरवणार. आपण खड्ड्यात जाणार की वर जाणार हे ही निवडणूक ठरवणार – राज ठाकरे

>>> आज हाणामारी, विधानसभेला कोथळे बाहेर काढतील – राज ठाकरे

>>> व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका – राज ठाकरेंचं जनतेकडे मागणं

>> फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेचा बिनशर्त पाठिंबा – राज ठाकरे

>>> विधानसभेच्या तयारीला लागा – मनसे कार्यकर्त्यांना आवाहन