तरुणांना नोकऱ्या देण्यात राजस्थान सरकार आघाडीवर

जयपुर – युवकांना नोकऱ्या देण्यात राजस्थान सरकार आघाडीवर असून आम्ही अलिकडच्या काळात राज्यातील दीड लाख युवकांना सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिली आहे. अजमेर येथे नुकताच एक महा नोकरी महोत्सव आयोजीत करण्यात आला होता.

त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते ते म्हणाले की आम्ही आत्तापर्यंत अलिकडच्या काळात दीड लाख सरकारी नोकऱ्या दिल्या असून अजून तितक्‍याच नोकऱ्या देण्याचे नियोजन आम्ही केले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकांना नोकरी नियुक्ती पत्र देण्यात आले.

ते म्हणाले की खासगी क्षेत्रातूनही युवकांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या दिल्या जात असून त्यासाठी जागोजागी नोकरी महोत्सव आयोजित केले जात आहेत. राज्यात कारखानदारी वाढण्यालाहीं चालना दिली जात असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती होईल याकडे लक्ष दिले जात आहे असे ते म्हणाले.