अद्रमुकच्या गोंधळा मुळे राज्यसभा तीनवेळ तहकुब

नवी दिल्ली – पोस्टमन भरतीची प्रक्रिया तामिळी भाषेत घेण्यात यावी अशी मागणी करीत अद्रमुक पक्षाच्या सदस्यांनी आज राज्यसभेत घातलेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकुब करावे लागले. सध्या पोस्टमन भरतीची जी परिक्षा प्रक्रिया सुरू आहे ती त्वरीत बंद करण्यात यावी आणि तामिळी भाषेत ही परिक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी त्यांची मागणी होती.

रविवारी झालेली ही परिक्षा केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेतच होती. अद्रमुक पक्षाची ही मागणी द्रमुक, आणि दोन्ही कमुयनिस्ट पक्षाच्या सदस्यांनी उचलून धरली. सभागृहातील चर्चेची संवेदनशीलता लक्षात घेऊन अध्यक्ष नायडू यांनी या कामकाजाचे दूरदर्शन प्रक्षेपण थांबवण्याचा आदेश दिला आणि कामकाज बारा वाजेपर्यंत तहकुब केले. त्यानंतरही हा गोंधळ सुरूच राहिल्याने आणखी दोनवेळा हे कामकाज तहकुब करावे लागले. सरकारतर्फे या विषयी उद्या सभागृहात निवेदन केले जाणार आहे.

Leave a Comment