निवडणूक आयोग हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातातील खेळणे – रणदीप सुरजेवाला

काँग्रेसची निवडणूक आयोगावर टीका

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना आचारसंहिता भंगप्रकरणी निवडणूक आयोगाने दिलेल्या क्लीन चिटवरून आता आयोगाअंतर्गत नाराजीसत्र सुरु झाले आहे. मोदी-शहांना क्लीन चिट देण्यावरून नाराज निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी क्लीन चीटवर आक्षेप घेतले आहेत. त्यानंतर काँग्रेसने देखील निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

याबाबत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरव्दारे प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. “निवडणूक आयोग हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातातील खेळणे झाले असल्याचे अशोक लवासा यांच्या पत्रावरुन स्पष्ट होत असल्याचे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

 

Leave a Comment